B'day: एअर होस्टेसला पाहून प्रेमात पडला होता पु्ष्कर, नंतर तिच्याशीच थाटले लग्न
- ️दिव्य मराठी
- ️Fri Jul 14 2017
एंटरनेटमेंट डेस्क - मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही नाव कमवलेला अभिनेता पुष्कर जोगने वयाची 32 वर्षे पूर्ण केली आहेत. खासकरुन मराठी चित्रपटांसाठी पुष्कर जोगला ओळखले जाते. 15 जुलै 1085 रोजी पुणे येथे जन्मलेल्या पुष्करचे बालपण पुण्यातच गेले. त्याने विद्या भवन आणि जे. बी. जोग कॉलेजमधून त्याचे शिक्षण पूर्ण केले. वयाच्या चौथ्या वर्षापासून पुष्करने अभिनयास सुरुवात केली होती. 2010 साली जिंकला होता नच बलिए मराठी..
केवळ 4 वर्षाचा असताना पुष्करने डान्स आणि अभिनयात रुची दाखविण्यास सुरुवात केली आणि मराठी चित्रपटसृष्टीत नाव कमावले. पुष्करने महाराष्ट्र राज्याचा सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळाला आहे. खूप कमी जणांना माहीत आहे की पुष्कर केवळ अभिनेताच नाही तर डेंटीस्टही आहे.
एअर होस्टेससोबत केला विवाह..
एका प्रवासादरम्यान पुष्करने एअर होस्टेस असलेल्या जास्मिनला पाहिले होते. तो प्रवास करत असलेल्या विमानातच जास्मिन एअर होस्टेस म्हणून काम पाहत होती. तिला पाहताच पुष्कर तिच्या प्रेमात पडला आणि काही काळ डेटींग केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2014 साली पुष्करने जास्मिन ब्रामभट्टसोबत विवाह केला.
यावर्षी अडकला होता वादाच्या भोवऱ्यात..
अभिनेता पुष्कर जोगवर यावर्षी फेब्रुवारीमध्ये त्याच्या इन्सटीट्युटमधील शिक्षकांनी त्याच्याविरुद्ध एफआयआर दाखल केली होती. पुष्करने त्यांना जातिवाचक शिवीगाळ केली असा त्यांनी आरोप केला होता. पुष्करला याबाबत विचारले असता त्याने याबद्दल काही न बोलणे पसंत केले.
पुष्करने या चित्रपटात केले आहे बालकलाकाराचे काम..
पुष्करने वाजवु का?, सुन लाडकी सासरची, साखरपुडा, रावसाहेब या चित्रपटात बालकलाकाराचे काम केले होते.
हिंदी चित्रपटातही केली बालकलाकाराची भूमिका..
पुष्करने हम दोनो, ऐसी भी क्या जल्दी है, आझमाईश या चित्रपटात बालकलाकाराची भूमिका केली होती. पुष्करने अनेक हिंदी चित्रपटातही काम केले आहे.
आज वाढदिवसानिमित्त पाहूया पुष्करच्या रिसेप्शनवेळीचे खास PHOTOs......