मिग-२१ - विकिपीडिया
- ️Fri Mar 01 2019
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
मिकोयान मिग-२१ | |
---|---|
रोमेनियन हवाई दलाचे मिग-२१ युएम विमान | |
प्रकार | लढाऊ विमान |
उत्पादक देश | रशिया |
उत्पादक | रशिया, चेकोस्लोव्हाकीया, भारत |
रचनाकार | अर्तेम मिकोयान |
पहिले उड्डाण | १४ फेब्रुवारी १९५५ |
समावेश | रशिया हवाई दल, पोलंड हवाई दल, रोमेनियन हवाई दल |
निवृत्ती | १९९० रशिया |
उपभोक्ते | रशिया, भारत अनेक |
उत्पादन काळ | १९५९ (मिग २१एफ) ते १९८५ (मिग २१ बीआयएस) |
उत्पादित संख्या | ११४९६ |
मिकोयान मिग-२१ हे एक सुपरसॉनिक प्रकारातील एका इंजिनाचे, रशियन बनावटीचे लढाऊ विमान आहे. या विमानाला बालालैका या टोपणनावानेही ओळखतात कारत हे त्या सदृष दिसणाऱ्या रशियन वाद्या सारखे दिसते. या विमानाच्या आकारामुळे त्याला पेन्सिल म्हणूनही ओळखले जाते. जगातील सुमारे ५० देशांमध्ये चार खंडात हे विमान वापरात आहे. हे जगातले सर्वाधिक प्रमाणात निर्मिती झालेल्या लढाऊ विमानांपैकी एक आहे. भारतात इ.स. १९६६ मध्ये नाशिक जवळ हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कंपनीच्या कारखान्यात या विमानांच्या उत्पादनास सुरुवात झाली आणि ६५७ विमानांची निर्मिती करण्यात आली.
या विमानाच्या संशोधनाला इ.स. १९५० मध्येच सुरुवात झाली. इ.स. १९५४ मध्ये या विमानाच्या पहिल्या प्रतिकृतीची ये१ नावाने निर्मिती झाली पण त्याचे इंजिन कमी शक्तीचे आहे हे लक्षात आल्याने सुधारित ये२, ये३ व ये४ आवृत्त्या बनवण्यात आल्या. १६ जून इ.स. १९५५ मध्ये या विमानाच्या ये४ प्रतिकृतीने हवाई झेप घेतली. मिग-२१ हे रशियाचे पहिले लढाऊ आणि प्रतिभेदक क्षमता एकत्र असलेले विमान ठरले. या विमानाचा आराखडा नंतर अनेक विमानांसाठी वापरला गेला.
मिग-२१ हे एक इंजिनी जेट विमान आहे. या विमानाच्या इंजिनात हवा विमानाच्या पुढील भागातून आत ओढली जाते. त्यामुळे यात रडार ठेवण्याची जागा उरत नाही. या कारणामुले पाश्चात्य देशात हा आराखडा फारसा उपयोगात आला नाही. तसेच या विमानात इंधनाच्या टाकीतून एका प्रमाणाबाहेर इंधन वापरले गेले तर विमानाचा गुरुत्व मध्य मागच्या बाजूला घसरतो. त्यामुळे याची क्षमता ४५ मिनिटे उड्डाणाची ठरते. या विमानाचा पल्ला २५० किलोमीटर आहे. याच्या त्रिकोनी पंखाच्या आकारामुळे हे विमान मोठ्या वेगात वर चढू शकत असले तरी वळवताना वेग मोठ्या प्रमाणात कमी होतो. पण हे विमान ४६२५० फुट प्रति मिनिट इतक्या वेगात हवेत झेप घेते. हा वेग अमेरिकेचे अत्याधुनिक एफ-१६ विमानाच्या तोडीचा आहे. या विमानाचे सोपे असलेले नियंत्रण, जोरदार इंजिन यामुळे हे विमान उडवण्यासाठी सोपे ठरते. तसेच विमानाच्या मुख्य पंखामागे असलेल्या छोट्या पंखांमुळे विमानाला स्थिरता लाभते. यामुळे नवख्या किंवा किमान प्रशिक्षण असलेल्या वैमानिकालाही हे विमान सहजतेने हाताळता येते. हा मुद्दा महत्त्वाचा ठरून मिग-२१ सुमारे ५० देशात निर्यात झाले. या विमानात अत्याधुनिक तंत्रज्ञानाची उणीव असतांनाही या विमानाला पसंती दिली गेली कारण याचे निर्मितीमूल्य कमी होते. शिवाय पुढे जाऊन अनेक रशियन, इस्रायेली आणि रोमेनियन कंपन्यांनी याच्या आधुनिकीकरणाची उपकरणे विकसित केली.
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/4/41/MiG-21_img_2506.jpg/220px-MiG-21_img_2506.jpg)
हे पोटाला बसवलेले असतात. उअतरण्यासाठी या विमानास तीन चाके आहेत.
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/c/cb/MiG-21_img_2540.jpg/220px-MiG-21_img_2540.jpg)
या विमानाच्या समोरील बाजूस असलेल्या शंकूने याच्या वेगाचे नियंत्रण केले जाते. त्यासाठी त्या शंकूचा आकार कमी जास्त केला जाऊ शकतो. याशिवाय विमानाचा वेग कमी करण्यासाठी या विमानाला तीन प्रतिरोधक बसवलेले आहेत.
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/6/62/MiG-21_cockpit.jpg/220px-MiG-21_cockpit.jpg)
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/e/e5/MiG-21_img_2497.jpg/220px-MiG-21_img_2497.jpg)
वैमानिक कक्षात हवेचा दाब नियंत्रित केले असून हे वातानुकूलित आहे. या विमानाचे सीट इजेक्ट होऊ शकते. हे होतांना ते वरील कॅनोपी (काचेच्या आवरणा)सहीत होते. यामुळे पायलटला वेगवान हवेचा सामना करावा लागत नाही. नंतर ही काच वेगळी होते आणि वैमानिक हवाई छत्रीच्या आधारे खाली येतो. मात्र कमी उंचीवरून उडतांना ही काच त्वरित वेगळी न झाल्याने काही वेळा अपघातही घडले आहेत.
मिग-२१ च्या आराखड्यात सुधारणा करून मिग-२३ आणि मिग-२७ची निर्मिती करण्यात आली.
भारतीय हवाई दलाने हे विमान इ.स. १९६१ साली खरेदी करण्याचे ठरवले. कारण तेव्हा रशियाने जुळणीसाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचे पूर्ण हस्तांतरण करण्याचे मान्य केले. या विमानाच्या रूपाने भारतीय हवाई दलात पहिल्या सुपरसॉनिक विमानाचे पदार्पण झाले. परंतु १९६५ च्या भारत-पाक युद्धात प्रशिक्षित वैमानिकांच्या कमतरतेमुळे याचा परिपूर्ण वापर झाला नाही. मात्र हे विमान काय करू शकते हे लक्षात आल्यामुळे भारतीय हवाई दल सतर्क झाले आणि या विमानाची मोठी मागणी रशियाकडे केली गेली. या शिवाय या विमानांच्या दुरुस्तीसाठी वेगळी यंत्रणा उभारली गेली. तसेच वैमानिक प्रशिक्षणावर अजून भर दिला गेला. इ.स. १९६९ मध्ये भारताकडे १२० मिग-२१ विमाने होती.
इ.स. १९७१ साली भारत-पाक युद्ध छेडले गेले. या युद्धात याच मिग-२१ विमानांनी मोठी मर्दुमकी गाजवली. भारतीय उपखंडात भारताची हवाई प्रहार शक्ती सर्वोच्च असल्याचा प्रत्यय दिला. पाकिस्तानच्या एफ-१०४ विमानांवर बसवलेल्या तोफांमुळे त्यांचा मोठा बोलबाला झाला होता. पण भारतीय वैमानिकांचे उत्तम प्रशिक्षण आणि मिग-२१ विमानांच्या प्रतिभेद शक्तीचा नेमका वापर करून पाकिस्तानची चार एफ-१०४ विमाने पाडली गेली. तसेच दोन एफ ६ विमाने, अमेरिकेने पुरवलेले एक एफ-८६ सेबर विमान आणि एक लॉकहीड सी-१३० हर्क्युलस विमान यांचा धुव्वा उडवला. या हवाई युद्धाने जगाचे लक्ष भारताच्या हवाईदलाकडे आणि मिग-२१ या विमानांकडे वेधले गेले. अनेक देशांनी भारताच्या वैमानिक प्रशिक्षणात रस घेतला. भारतानेही अनेक देशांच्या वैमानिकांना प्रशिक्षण दिले. १९७० च्या दशकात सुमारे १२० इराकी वैमानिक भारतातून प्रशिक्षित होऊन गेले.
इ.स. १९९९ साली पाकिस्तान ने घुसखोरी केल्याने भारत-पाक युद्ध छेडले गेले. या युद्धातही मिग-२१ विमानांचा वापर भारताने केला. मात्र या युद्धात एक विमान पाकिस्तानी रॉकेट लॉंचरद्वारे पाडले गेले. मात्र त्याचवेळी भारतीय हवाईदलाच्या याच विमानांनी हवेतल्या हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राचा प्रयोग करून पाकिस्तानी नौदलाचे ब्रिगेट अट्लांटिक विमान पाडले.
दिनांक | विजेते विमान | वैमानिक | पाडलेले विमान |
---|---|---|---|
४ सप्टेंबर १९६५[१] | भारतीय हवाई दल मिग-२१एफ-१३ | ? | पाकिस्तानी हवाई दल एफ-८६ |
४ डिसेंबर १९७१[२] | मिग-२१एफ "सी११११" | FltLt मनबीर सिंग | पाकिस्तानी हवाई दल एफ-८६ |
६ डिसेंबर १९७१[१] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | FltLt समर बिक्रम शाह | पाकिस्तानी हवाई दल एफ-६ |
६ डिसेंबर १९७१[१] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | ? | पाकिस्तानी हवाई दल लॉकहीड सी-१३० हर्क्युलस विमान |
११ डिसेंबर १९७१[२] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | ? | मिग-२१ एफएल "सी११०७" |
१२ डिसेंबर १९७१[२] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल "सी७५०" | FltLt भारत भूषण सोनी | पाकिस्तानी हवाई दल एफ-१०४ए |
१२ डिसेंबर १९७१[२] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | FltLt नीरज कुकरेजा | पाकिस्तानी हवाई दल एफ-१०४ए |
१२ डिसेंबर १९७१[२] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | SqnLdr इक्बालसिंग बिंद्रा | पाकिस्तानी हवाई दल एफ-१०४ए |
१२ डिसेंबर १९७१[१] | पाकिस्तानी हवाई दल एफ-६ | ए ए शफेफी | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल |
१६ डिसेंबर १९७१[२] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | FltLt समर बिक्रम शाह | पाकिस्तानी हवाई दल एफ-६ |
१७ डिसेंबर १९७१[२] | पाकिस्तानी हवाई दल एफ-८६एफ | FltLt मक्सूद आमिर | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल "सी७१६" |
१७ डिसेंबर १९७१[१] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | ए. के. दत्ता | पाकिस्तानी हवाई दल एफ-१०४ए |
१७ डिसेंबर १९७१[१] | भारतीय हवाई दल मिग-२१ एफएल | समर बिक्रम शाह | पाकिस्तानी हवाई दल एफ-१०४ए (जायबंदी) |
१९९९[१] | भारतीय हवाई दल मिग-२१बीआयएस | अंझा साम | पाकिस्तानी हवाई दल |
१० ऑगस्ट १९९९[२] | भारतीय हवाई दल मिग-२१बीआयएस (४५ स्क्वाड्रन) | SqnLdr प्रशांत कुमार बुंदेला | पाकिस्तानी हवाई दल ब्रिगेट अटलंटिक |
फेब्रुवारी २०१९[३] | भारतीय हवाई दल मिग-२१ बायसन | विंग कमांडर अभिनंदन वर्धमान | पाकिस्तानी हवाई दल एफ-१६ फायटिंग फॉल्कन |
या विमानाचा व्हियेतनाम मध्येही परिणामकारक वापर झाला. तेथे तर व्हियेतनामी वैमानिकांनी पाच-पाच विमाने या विमानाचा वापर करून पाडली.
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/3/30/Mikoyan-Gurevich_MiG-21_3-view_line_drawing.png/220px-Mikoyan-Gurevich_MiG-21_3-view_line_drawing.png)
![](https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/thumb/1/12/Mikoyan-Gurevich_MiG-21PF_USAF.jpg/220px-Mikoyan-Gurevich_MiG-21PF_USAF.jpg)
- ^ a b c d e f g "Indian Air-to-Air Victories since 1948." acig.org. Retrieved: 1 December 2010.
- ^ a b c d e f g h चुका उधृत करा:
<ref>
चुकीचा कोड;Gordon 2008
नावाने दिलेल्या संदर्भांमध्ये काहीही माहिती नाही - ^ author/lokmat-news-network. "तंत्रज्ञानात मागे असूनही मिग-२१ ने एफ-१६ कसे पाडले?". Lokmat. 2019-03-01 रोजी पाहिले.