लील - विकिपीडिया
- ️Mon Oct 12 2009
लील
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
लील (फ्रेंच: Lille) हे उत्तर फ्रान्समधील बेल्जियमच्या सीमेजवळील एक शहर व नोर-पा-द-कॅले ह्या प्रदेशाची तसेच नोर ह्या विभागाची राजधानी आहे. लील हे फ्रान्समधील चौथे मोठे महानगर (पॅरिस, ल्यों व मार्सेल खालोखाल) आहे. लील शहर पॅरिसच्या ईशान्येस २२० किमी अंतरावर तर ब्रसेल्सच्या पश्चिमेस ११२ किमी अंतरावर स्थित आहे.
अनेक शतकांचा इतिहास असलेले व फ्रान्सच्या सांस्कृतिक पटलावर मानाचे स्थान असलेल्या लीलची २००४ साली युरोपियन सांस्कृतिक राजधानीसाठी निवड करण्यात आली होती.
युरोपाच्या दृतगती रेल्वेमार्गांवरील लील हे एक महत्त्वाचे स्थानक आहे. फ्रेंच टी.जी.व्ही.मुळे येथून पॅरिसला एका तर युरोस्टारद्वारे लंडनला १:२० तासात पोचता येते. नागरी वाहतूकीसाठी लीलमध्ये अद्यवायत बस, शहरी रेल्वे व ट्राम कार्यरत आहेत.
फुटबॉल हा येथील सर्वात लोकप्रिय खेळ असून लीग १मध्ये खेळणारा लील ओ.एस.सी. हा येथील प्रमुख संघ आहे.
जगातील खालील शहरांसोबत लीलचे सांस्कृतिक संबंध आहेत.
- अधिकृत संकेतस्थळ Archived 2009-10-12 at the Wayback Machine.
विकिव्हॉयेज वरील लील पर्यटन गाईड (इंग्रजी)